Save water essay in Marathi

greatfriction.com

                         पाणी वाचवा निबंध

greatfriction.com

greatfriction.com

Save water essay in Marathi:    माणसाला जीवन जगण्यासाठी तीन मूलभूत गोष्टी लागतात. त्या म्हणजे अन्न, वस्र आणि निवारा हॊय. अन्न या गोष्टी मध्ये अन्न म्हणजेच जेवण येत. वस्र या गोष्टी मध्ये वस्र म्हणजेच ‘कपडे’ येतात. आणि निवारा या गोष्टी मध्ये हवा व भूमी येते. यांचं मधील एक गोष्ट आहे जी लवकर लुप्त म्हणजेच संपत येत आहे. ती गोष्ट म्हणजे पाणी होय.

पाणी हे जीवन आहे. हि पृथ्वीवर ७१% पाण्याने व्यापलेली आहे. आणि २९% जमीने ( भूमीने ) व्यापलेली आहे. या पृथ्वीवर पिण्या लायक पाणी खूपच कमी आहे. पृथ्वीवर जीवन कायम ठेवायचे असेल तर पाणी वाचवले पाहिजे. आपल्या सुर्यमालेत एकमेव जीवन असलेलं ग्रह म्हणजे पृथ्वी होय. कारण जीवन जगण्यासाठी उपयुक्त सर्व गोष्ठ पृथ्वीमध्ये आहेत. त्यातली एक महत्वाची गोष्ट म्हणजे पाणी होय. पाण्याचा एक- एक थेंब खूप मौल्यवान आहे. पाणी हे देवाने दिलेली एक अमृत आहे.

आजच्या दिवसात पिण्या लायक पाणी पाहिलेपेक्षा खूप कमी होत चालली आहे. आपण पाण्याविषयी काहीच काळजी घेत नाही. हा ! फक्त नावाला घोषणा देण्यासाठी बरोबर ”पाणी वाचवा ” अशी घोषणा देतात. परंतु काहीच लोक असे आहेत ज्यांना पाण्याचे महत्व माहित आहे. आणि तेच पाण्याचा नीट वापर करू शकतात. सर्वात जास्त पाणी वाया जाते ते म्हणजे शहरात. शहरातील रहिवासी अंघोळीला गेले कि कि एक-दोन तासपर्यंत बाहेर येत नाहीत. ते पाणी अंघोळीच्या वेळी खुप वाया घालवतात.

काही गाव असे आहेत कि त्यांना पाणी घेण्यासाठी किंवा मिळवण्यासाठी खूप लांब प्रवास करावा लागतो. त्या लोकांना पाण्याची खरी किंमत माहित असते. हल्ली, आपली सरकार यावर उपाय-योजनाही तयार करत आहेत. आपण फक्त पाण्याचा कमीत-कमी उपयोग केला पाहिजे. आपण पाण्याचा उपयोग केला पाहिजे परंतु मायादित केला पाहिजे. आपण जर आतापासून जर पाणी वाचवले तर भविष्यात पाण्याची टंचाई होणार नाही. अस म्हण्टलं जातंय कि भविष्यात काहीच जणांना पिण्या लायक पाणी भेटेल आणि बाकीच्यांना पिण्यालायक पाणी भेटणार नाही. अशी संभावना दिली जाते.

आपण जेव्हा कोणत्या समारंभात जातो तेव्हा खान-पिन असता तेव्हा खूप अन्नहि वाया जाते आणि तसेच पाणी हि वाया जाते. पाणी हे खूप बहुमोल असते. हि सृष्टी पाणी मुळेच निर्माण झाली आहे असे हि म्हण्टले जाते. आपल्याला जर कोणताही नळतुन पाणी वाया होत असताना दिसल्याच ते नळ बंद करणे आपले कर्तव्य आहे. अंघोळीला जेवढे पाणी उपयुक्त आहे तेवढ्याच पाणीने अंघोळ केली पाहिजे. पाणी पित असताना जर थोडेसे पाणी उरले असेल तर ते इकडे-तिकडे फेकण्या ऐवजी ते पाणी झाडाला टाकावे. बीन कारणाने पाणी वाया घालणे हे चुकीच असते.
       आपण पाणी सांभाळून वापरले पाहिजे. काय माहित उद्या म्हणजे भविष्यात जर २० रुपयाची पाण्याची बाटली २००० रुपयास भेटली तर! ………………………………………………………………………………………………..Save water essay in Marathi

save water in english greatfriction.com

save water  from wikipedia

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Related Post